Roshan More
५०० कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर आता होणार ५ शासन नामनिर्देशित सदस्य असणार आहेत.
राज्यातील ज्या सहकारी संघिक संस्थांची वार्षिक उलाढाल ५०० कोटींहून अधिक आहे, त्याच संस्थांना हा नवीन नियम लागू होईल.
पाच सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्यामध्ये एक सहाय्यक निबंधक किंवा त्याहून वरील दर्जाचा शासकीय अधिकारी असेल. तर इतर चार जण हे सहकार क्षेत्रातील कामाचा अनुभव असलेल्या तज्ज्ञ व्यक्ती असतील.
शासकीय अधिकारी यांना संचालक मंडळात मताचा अधिकार नसेल. मात्र, इतर ४ तज्ज्ञ सदस्य यांना संचालक मंडळात मताचा अधिकार असेल.
नामनिर्देशित ४ तज्ज्ञ सदस्यांना मतदानाचा अधिकार असला, तरी ते संस्थेच्या पदाधिकारी म्हणून अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी पात्र राहणार नाहीत.
ही नवीन सुधारणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना (DCC Bank) लागू राहणार नाही. त्यांना यातून वगळण्यात आले आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम ७३ अअअ (२) च्या परंतुकामध्ये नवीन परंतुक समाविष्ट करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.
घरातील व्यक्तीने मृत्यूपत्र केलं नाही अन् अचानक काही घडलं... तर बँक खात्यातले पैसे अन् घर कुणाला मिळतं?