Maharashtra Budget 2024 : महिला, मुली अन् शेतकरी, अर्थसंकल्पात कुणाच्या वाट्याला काय?

Akshay Sabale

शेतकरी, विद्यार्थी अन्... -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी, विद्यार्थी, युवक, महिला, मागसवर्गीय अशा सर्व घटकांना न्याय देणार अर्थसंकल्प सादर केला. त्यातील काही मुद्दे जाणून घेऊया.

ajit pawar | sarkarnama

तीन गॅस सिलिंडर -

अन्नपुर्णा मुख्यमंत्री योजनेंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत.

ajit pawar | sarkarnama

लाडकी बहीण योजना -

लाडकी बहीण योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील महिला आणि तरूणींना प्रत्येक महिन्याला 1,500 रूपये वाटप करण्यात येणार आहे.

ajit pawar | sarkarnama

सामूहिक विवाह योजना -

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचे अनुदान 10,000 रूपयांवरून आता 25,000 रूपये करण्यात आले आहे.

ajit pawar | sarkarnama

वीज बील माफ -

राज्यातील शेती कृषी पंपाचे सर्व थकित बील माफ करण्यात आलं आहे.

ajit pawar | sarkarnama

मुलींना शिक्षण शुल्क माफ -

8 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्ब घटकातील मुलींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे.

ajit pawar | sarkarnama

पेट्रोल-डिझेल स्वस्त -

मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील पेट्रोलचे दर 65 पैसे आणि डिझेलचे दर 2 रूपये 7 पैशाने कमी होतील.

ajit pawar | sarkarnama

युवा कार्य प्रशिक्षण योजना -

युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 10 हजार रूपयांचे विद्यावेतन दिले जाणार आहे.

ajit pawar | sarkarnama

NEXT : तिसऱ्या प्रयत्नात 'तिसरी' रँक

IAS Pratibha Verma | Sarkarnama
क्लिक करा...