Pradeep Pendhare
2009 विधानसभा निवडणुकीत मनसेने 143 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 13 जागांवर मनसेच्या उमेदवारांना विजय मिळवला.
2009 विधानसभा 130 जागांवर पराभव झाला होता. मात्र, 130 जागांवर मतांची टक्केवारी चांगली होती.
2014 विधानसभा निवडणुकीत 219 जागा मनसेने लढल्या. त्यात एक जागेवर विजय मिळाला, तर 218 जागांवर पराभव झाला.
2019 विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने 101 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी एका जागेवर विजय मिळाला, तर 100 जागांवर अपयश मिळालं.
या 2024 विधानसभा निवडणुकीत मनसेने 125 उमेदवार उभे केलेले आहेत, या परीक्षेत किती मार्क पाडणार याची उत्सुकता आहे.
मुंबई आणि ठाण्यात 54 मतदारसंघात मनसे 41 जागांवर लढत आहे. याठिकाणी मविआ, महायुती आणि मनसेस अशी तिरंगी लढत होईल.
वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे, मनसेचे संदीप देशपांडे आणि शिवसेना पक्षाचे मिलिंद देवरा रिंगणात आहेत.
मुंबई माहीममधून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा सामना शिवसेना पक्षाचे सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे महेश सावंत यांच्यात लढत आहे.