Raj Thackeray : ही क्रांतीची वेळ, शस्त्र बाहेर काढा; राज ठाकरेंनी मांडले 10 महत्त्वाचे मुद्दे

Akshay Sabale

जनतेशी संवाद -

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. ते 10 मुद्द्यांमध्ये जाणून घेणार आहोत...

Raj Thackeray.jpg | sarkarnama

सोनं लुटलं जातंय -

महाराष्ट्राचं सोनं गेल्या अनेक वर्षांपासून लुटलं जात आहे. आम्ही फक्त आपट्याची पानं वाटतोय.

Raj Thackeray.jpg | sarkarnama

ही प्रगती नाही -

रस्ते आणि पूल बांधणं ही प्रगती नाही. मोबाईल, टीव्ही हे गॅझेट म्हणजे प्रगती नाही. प्रगती डोक्याने समाजाची व्हावी लागते.

Raj Thackeray.jpg | sarkarnama

बेसावध राहू नका -

आजचा दसरा हा निवडणुकीच्या तोंडावर आहे. अशा वेळेला तुम्ही बेसावध राहून चालणार नाही.

Raj Thackeray.jpg | sarkarnama

राग दिसत नाही -

तुमच्यातला राग मला कधी दिसत नाही. त्याच-त्याच लोकांना तुम्ही निवडून देता.

Raj Thackeray | sarkarnama

शस्त्र ठेवून देता -

मतदानाच्या दिवशी तुम्ही मतांचं शस्त्र ठेवून देता. नंतर शस्त्र बाहेर काढता.

Raj Thackeray | sarkarnama

तुमच्याशी प्रतारणा केली -

तुम्ही सर्वांना संधी देता. ज्यांना तुम्ही सांभाळलं, त्यांनी तुमच्याशी प्रतारणा केली.

Raj Thackeray | sarkarnama

गृहीत धरलं -

खास करुन गेली पाच वर्ष ज्यांनी तुमच्या मतांशी प्रतारणा केली, तुम्हाला गृहीत धरलं, वेड्यावाकड्या युत्या आघाड्या करत राहिले. 

Raj Thackeray | sarkarnama

बेसावध राहू नका -

या निवडणुकीत बेसावध राहू नका. शमीच्या झाडावरची ती शस्त्रं उतरवा. ही क्रांतीची वेळ, वचपा काढण्याची वेळ आहे

Raj Thackeray | sarkarnama

संधी द्यावी -

गेल्या अनेक वर्षांपासून मी महाराष्ट्राचं स्वप्न पाहातोय, ते साकारण्याची संधी मला मिळू दे.

Raj Thackeray | sarkarnama

हे माझं स्वप्न -

जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा असं माझं स्वप्न आहे. सगळी शस्त्र उतरवा आणि मतदानाला या सगळ्यांचा वेध घ्या.

Raj Thackeray | sarkarnama

NEXT : कोण आहेत नोएल टाटा? जे ठरले रतन टाटांचे उत्तराधिकारी अन् सांभाळणार TATA ट्रस्टची जबाबदारी

Ratan Tata | Sarkarnama
क्लिक करा...