Jagdish Patil
रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड करण्यात आली आहे.
मुंबईतील टाटा ट्रस्टच्या बैठकीत सर्वानुमते नोएल यांना अध्यक्ष करण्याचा निर्णय झाला.
त्यामुळे आता रतन टाटा यांचे उत्तराधिकारी नोएल टाटा असतील हे जाहीर झालं आहे.
नोएल हे सध्या सर दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त असून आता त्यांच्याकडे टाटा ट्रस्टची जबाबदारी देखील आली आहे.
जवळपास 100 देशांमध्ये विस्तारलेल्या टाटा समूहाचे नेतृत्व करणारे आणि रतन टाटांचे उत्तराधिकारी ठरलेले नोएल टाटा कोण आहेत? जाणून घेऊया.
नोएल हे रतन टाटांचे सावत्र भाऊ म्हणजेच रतन टाटांचे वडील नवल टाटा आणि सिमोन टाटा यांचे पुत्र आहेत.
ते सध्या टाटा इंटरनॅशनल लिमिटेडचे अध्यक्ष आणि नॉन-एक्झिक्युटिव संचालक आहेत.
तसेच ते ट्रेंट, व्होल्टास आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष, टाटा स्टील आणि टायटन कंपनी लिमिटेडचे उपाध्यक्ष आहेत.
नोएल यांचे लग्न आलू मिस्त्री यांच्याशी झाले असून त्यांना लेआ, माया आणि नेविल नावाची 3 अपत्य आहेत.