Jagdish Patil
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आता युती-आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? यावरून कलगीतुरा रंगला आहे.
ज्या पक्षाचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री असंही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्यामुळे हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे.
मात्र, आमदारांची संख्या कमी असतानाही इतर पक्षांसाठी मुख्यमंत्रिपदाचा त्याग केल्याची परंपरा महाराष्ट्राला आहे. ती कधीपासून आहे ते जाणून घेऊया.
सर्वात पहिला हा प्रयोग 1995 मध्ये झाला त्यावेळी शिवसेनेचे 73 आमदार असातना मनोहर जोशी मुख्यमंत्री बनले.
त्यानंतर 1999 मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले तेव्हा काँग्रेसचं संख्याबळ 75 इतकं होतं. 2004 मध्ये पुन्हा देशमुखचं CM झाले तेव्हा 68 आमदार होते.
2009 मध्ये 82 आमदार असताना अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली.
दरम्यान, 2014 ते 2019 या कालावधीत देवेंद्र फडणवीसांनी CM पद भुषवलं. मात्र त्यांचं संख्याबळ जास्त म्हणजे 122 इतकं होतं.
2019 ते 2022 मध्ये उद्धव ठाकरेंनी 'मविआ'चा प्रयोग करत भाजपकडे 103 संख्याबळ असतानाही त्यांना विरोध बाकावर बसायला लावलं. आणि 56 आमदार असाताना ते मुख्यमंत्री बनले.
तर 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंना केवळ 40 आमदार असताना मुख्यमंत्री बनले.