Jagdish Patil
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर EVM चा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे.
पराभूत उमेदवारांनी मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप करत EVM च्या फेरमतमोजणीसाठी अर्ज केला आहे.
न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या मतमोजणीनंतर उमेदवाराला EVM च्या बर्न्ट मेमरीच्या पडताळणीची सुविधा दिली आहे.
बर्न्ट मेमरी म्हणजे, त्या मशीनचा वापर किती झाला आहे. याबाबतची माहिती दिली जाते.
निकालानंतर 7 दिवसांच्या आतच मतमोजणीबाबत आक्षेप नोंदवला जावू शकतो.
उमेदवारांचा आक्षेप अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी स्विकारल्यास तपासणीसाठी एकूण वापरलेल्या 5 टक्के EVM उपलब्ध केली जातात.
नियमानुसार एका EVM साठी उमेदवाराला जवळपास 47 हजार रुपये इतकी रक्कम भरावी लागते.
EVM मधील फेरमतमोजणीचा निवडणूक अधिकाऱ्याने दिलेला निकाल अमान्य असल्यास उमेदवार कोर्टात जावू शकतो.
फेरमतमोजणीची मागणी केली नसली तरीही निकालापासून 90 दिवसांपर्यंत सर्व EVM आणि VVPAT सह इतर साम्रगी आयोगाकडून सांभाळून ठेवली जाते.