सरकारनामा ब्यूरो
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे.
राज्यात विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबर 2024 ला होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्रात 288 जागांसाठी एक्काच टप्प्यात मतदान होणार आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाने घर बसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
घर बसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध असणाऱ्यामध्ये जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. ज्यांचे वय 85 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा नागरिकांनी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तसेच दिव्यांग असणाऱ्या नागरिकांना घर बसल्या मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगामार्फत देण्यात आली आहे.