Rashmi Mane
विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आणि महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आजवर राज्यातील राजकीय कुटुंबातील मतभेद अनेक निवडणुकांमध्ये दिसून आला आहे. एकाच घराण्यातील नेतेमंडळी किंवा त्यांचे वारसदार एकमेकांविरुद्ध लढले आहेत. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशाच नेत्यांच्याबद्दल...
इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी) विरुद्ध नीलय नाईक (भाजप) असा सामना झाला होता.
बीडमधील राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे काका आणि शिवसेनेचे उमेदवार, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यात निवडणूक झाली होती.
पंकजा मुंडे भाजपकडून लढल्या तर त्यांचे चुलत बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यात सामना झाला होता.
भाजपचे जयकुमार गोरे विरुद्ध अपक्ष प्रभाकर देशमुख
भाजपचे संभाजी पाटील-निलंगेकर यांनी त्यांचे काका अशोकराव पाटील-निलंगेकर विधानसभा निवडणुकीत आमने- सामने होते.
सांगली 1995च्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार प्रकाशबापू पाटील त्यांच्याविरोधात मदन पाटील प्रकाशबापू पाटलांचे काका एकमेकांविरूद्ध लढले होते.
सिंदखेडराजा मतदारसंघात 2014ला राष्ट्रवादी पक्षाच्या रेखाताई खेडेकर आणि शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर एकमेकांविरोधात लढले होते.