सरकारनामा ब्यूरो
'पाणीदार आमदार' म्हणून ओळख असणारे अनिल बाबर हे खानापूर-आटपाडी विधानसभेचे आमदार होते.
शेतकरी कुटुंबात जन्म अन् तिथेच लहानाचे मोठे झालेल्या बाबर यांनी वयाच्या 19 व्या वर्षी राजकारणात पहिले पाऊल टाकले होते.
निष्कलंक, खंबीर आणि मजबूत व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी राजकारणात आपली चांगला ठसा उमटवला आहे.
सरपंच पदापासून ते आमदारकीपर्यंत जवळपास 50 वर्षे राजकारणात ते सक्रिय कार्यरत राहिले.
प्रशासन आणि अधिकारी यांच्यावर मजबूत पकड असल्याने बाबर यांच्या अंतर्गत अनेक महत्त्वाची विकासकामे पार पडली.
सलग 20 वर्षे सांगलीच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदावर त्यांनी काम केले होते.
चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या बाबर यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा राजकीय प्रवास आहे.
अत्यंत शांत आणि अभ्यासू होते त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात त्यांची घट्ट अशी पकड होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अनेक दिग्गज नेत्यांचे ते विश्वासू आणि जवळचे नेते अशी त्यांची विशेष ओळख होती.