Pradeep Pendhare
राज्यातील प्रत्येक बालकापर्यंत आरोग्य, शिक्षण, पोषण आणि सामाजिक सुरक्षेच्या योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने नव्याने तयारी केली आहे.
बालकांमध्ये त्यांच्या हक्क व अधिकारांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देश त्यामागे असणार आहे.
यातून ‘बालस्नेही ग्रामपंचायत’ आणि ‘बालस्नेही प्रभाग’ ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली.
‘5 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत ग्रामीण व शहरी भागात विशेष अभियानाच्या स्वरूपात बालस्नेही ग्रामपंचायत आणि बालस्नेही प्रभाग ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.
कुपोषण निर्मूलन, बालविवाह प्रतिबंध, एकात्मिक बाल संरक्षण योजना, पोषण, शिक्षण आणि बालसुरक्षा या विषयांवर ग्रामपंचायतींच्या माध्यमातून प्रभावी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
आदिवासी भागातील सुमारे प्रत्येकी 500 शासकीय आणि खासगी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या जवळपास पाच लाख विद्यार्थ्यांसाठी बालस्नेही ग्रामपंचायत राबविताना प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करावी.
शहरी भागात बालस्नेही प्रभाग राबविताना नगरविकास विभागाशी समन्वय साधून लोकसंख्येच्या तुलनेत अंगणवाड्यांची संख्या अपुरी असल्यास नवीन बालवाडी केंद्रे सुरू करण्याबाबत कार्यवाही होणार
बालपंचायतींच्या माध्यमातून शिक्षणाचा अधिकार, बालहक्क, ‘1098’ चाइल्ड हेल्पलाइन आणि विविध संरक्षण यंत्रणांची माहिती प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून बालकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश आहेत.