PM Modi in Ukraine : पंतप्रधानांनी ठेवला झेलेन्स्की यांच्या खांद्यावर हात; युद्धभूमी युक्रेनमधील मोदींचे फोटो पाहिले का?

Rashmi Mane

मोदींचा युक्रेन दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) युक्रेनमध्ये पोहोचले. 2022 मध्ये रशियासोबत युद्ध सुरू झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच युक्रेन दौरा आहे.

PM Modi in Ukraine | Sarkarnama

युरोप दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. मोदी 21 आणि 22 ऑगस्टला पोलंडच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर राजधानी वॉर्सा येथे होते, यानंतर मोदी ट्रेनने युक्रेनला पोहोचले.

PM Modi in Ukraine | Sarkarnama

राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की

त्याच्या या दौऱ्यात पंतप्रधान मोदी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी रशिया आणि युक्रेनच्या युद्ध परिस्थितीबद्दस मारिन्स्की पॅलेसमध्ये सुमारे 3 तास बैठक झाली.

PM Modi in Ukraine | Sarkarnama

मुलांना श्रद्धांजली

याभेटी दरम्यान भारत आणि युक्रेनमध्ये करार करण्यात आले. तत्पूर्वी, मोदी झेलेन्स्कीसोबत युक्रेनच्या राष्ट्रीय संग्रहालयात पोहोचले, जिथे त्यांनी युद्धात मारल्या गेलेल्या मुलांना श्रद्धांजली वाहिली.

PM Modi in Ukraine | Sarkarnama

मोदींचे स्वागत

10 तासांच्या रेल्वे प्रवासानंतर मोदी कीव येथे पोहोचले. येथे मोदींचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

PM Modi in Ukraine | Sarkarnama

युक्रेनला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान मोदी हे युक्रेनला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. 1991 मध्ये सोव्हिएत युनियन तुटल्यानंतर युक्रेनची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत एकही भारतीय पंतप्रधान युक्रेनला गेले नव्हते.

PM Modi in Ukraine | Sarkarnama

मोदींचा युक्रेन दौरा

या दौऱ्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेनेही पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे.

PM Modi in Ukraine | Sarkarnama

आदरांजली

दरम्यान, मोदींनी फोमिन बोटॅनिकल गार्डन येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली.

PM Modi in Ukraine | Sarkarnama

Next : IAS दाम्पत्याचे केरळवर राज्य; पती निवृत्त होताच पत्नीला मिळणार मुख्य सचिवपद...

येथे क्लिक करा