Bhushan Gavai : आंबेडकरी चळवळीचा वारसा, वडील माजी खासदार; महाराष्ट्राचे सुपुत्र होणार सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश

सरकारनामा ब्यूरो

भूषण गवई

सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई हे सरन्यायाधीश होणार असून मे महिन्यात ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील. 

Bhushan Gavai | Sarkarnama

52 वे सरन्यायाधीश

सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर पुढील 52 वे सरन्यायाधीश कोण होणार हा प्रश्न सर्वांना पडला होता. पण आता महाराष्ट्राचे भूषण गवई यांच्या नाव निश्चित झाले आहे.

Bhushan Gavai | Sarkarnama

वकील

भूषण गवई हे अमरावतीचे रहिवासी असून 1985 ला वकील म्हणून त्यांनी त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात केली.

Bhushan Gavai

'लेडी गवर्नर' कमलाताईंचे पुत्र

ते माजी राज्यपाल आणि आरपीआय नेते आरएस गवई आणि 'लेडी गवर्नर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत. तर, त्यांचे वडील रामकृष्ण गवई हे राज्यसभेचे माजी खासदार तसेच केरळ, बिहारचे राज्यपाल होते.

Kamaltai Gawai | Sarkarnama

बॅ.राजा एस भोसलेंसोबत काम

गवई यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिवंगत बॅ. राजा एस. भोसले यांच्यासोबत काम केले आहे. मुंबईमध्ये उच्च न्यायालयाचे वकील म्हणूनही काम केले.

Bhushan Gavai | Sarkarnama

महत्त्वाची कामगिरी

नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठासाठी स्थायी वकील म्हणून त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

Bhushan Gavai | Sarkarnama

 सरकारी वकील

सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटनुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून 1992 ते जुलै 1993 या कालावधीत त्यांची नियुक्त करण्यात आली होती.

Bhushan Gavai | Sarkarnama

न्यायाधीश म्हणून नियुक्ती

नोव्हेंबर 2003 ला मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची पदोन्नती झाली. 12 नोव्हेंबर 2005 ला गवाई यांची कायम न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Bhushan Gavai | Sarkarnama

सहा महिन्याचा कार्यकाळ

14 मे 2025 पासून ते 23 नोव्हेंबर 2025 ला म्हणजेच सहा महिन्याचा कार्यकाळानंतर ते निवृत्त होतील.

Bhushan Gavai | Sarkarnama

NEXT : तासाला 2 कोटी, दिवसाला 48 कोटी अन् वर्षाला...; जगातला सर्वाधिक पगार घेणारा व्यक्ती, कोण आहेत जगदीप सिंग?

येथे क्लिक करा...