सरकारनामा ब्युरो
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मार्कशीट हातात मिळायला एक आठवडा जातो.
पण डीजीलॉकरच्या माध्यमातून तुम्ही निकाल लागल्यानंतर लगेचच मार्कशीट बघू शकता.
यासाठी तुमचा लॉगिन आयडी आणि सिक्युरिटी पिन टाकून डिजिलॉकर अॅपमध्ये लॉगिन करा.
तुमच्यासमोर अॅप्लिकेशनचा डॅशबोर्ड ओपन होईल. अॅपमधील सर्च बारवर टॅप करा.
सर्च बॉक्समध्ये Class X Marksheet किंवा Class XII Marksheet मार्कशीट टाइप करा.
किंवा तुमचे राज्य निवडा. पुढे तुम्हाला कोणते डॉक्युमेंट हवे आहे ते निवडा.
तुम्हाला ज्या वर्गाची मार्कशीट मिळवायची आहे ती निवडा. यानंतर, नवीन पेजवर तुमचा रोल नंबर, रोल कोड आणि उत्तीर्णतेचे वर्ष निवडा.
शेवटी Get Document बटणावर टॅप करा आणि तुमची गुणपत्रिका डाउनलोड करा.
तर अशा प्रकारे तुम्ही घरी बसून डिजीलॉकरवरून मार्कशीट डाउनलोड करू शकता.