सरकारनामा ब्यूरो
प्रकाश आनंदराव आबिटकर यांचा जन्म 30 जून 1974 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी या गावात झाला.
आबिटकर यांनी बी.ए.ऑनर्स मध्ये पदवी घेतले त्यानंतर (LLB)चे शिक्षण घेत वकील झाले.
शिक्षण घेत असताना त्यांची निवड एका सार्वजनिक तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी करण्यात आली.
वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी गारगोटी पंचायत समितीच्या मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवत त्यांनी मोठ्या मताधिक्याने यश मिळावले.
2002 ते 2007 या दरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे.
2009 ची विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. ते 36000 हजार हून अधिक मते मिळवत आमदार झाले.
शिवसेनेकडून 2014 ची विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार के.पी.पाटील यांच्याकडून त्याचा पराभव झाला.
2019च्या विधानसभा निवडणूकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून दुसऱ्यांदा बाजी मारत त्यांना आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
देशाच्या सन्मानीय राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मु यांच्या हस्ते 2019-20 सालचा “उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार”देण्यात आला.
राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे.