सरकारनामा ब्यूरो
मुश्रीफ यांनी बी. ए. ऑनर्स मध्ये पदवी मिळवली आहे.
1999 पासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य होते. आता त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
2024 विधानसभेच्या निवडणुकीत ते कागल या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
त्यांनी पंचायत समिती कागलचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, तसेच श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कोल्हापुरचे संस्थापक अशा पदावर कार्यभार सांभाळला आहे.
मुश्रीफ यांची जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
1996 ते 1999 मध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन,1995 ते 2009 या काळात जिल्हा बँकेचे संचालक म्हणून कार्यभार पाहिला.
2004 मध्ये मत्स्यव्यवसाय, विधी व न्याय पधुसंवर्धन, कमाल जमीन धारणा, दुग्धविकास, राज्यमंत्री म्हणून तर कामगार व जलसंपदा या खात्याचे कॅबिनेटमंत्री म्हणून कार्यभार पाहिला.
2024 च्या विधानसभा निवडणूकीत ते 11, 879 इतक्या मतांनी विजयी होऊन सलग सहाव्यांदा आमदारपदी त्यांची निवड झाली आहे.