Cabinet Meeting : सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करणारे मंत्रिमंडळ बैठकीतील 'नऊ' महत्त्वाचे निर्णय

सरकारनामा ब्यूरो

नागरी बाल विकास केंद्र

अतितीव्र कुपोषित बालकांसाठी राज्यभरात नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

Cabinet Meeting | Sarkarnama

ग्रामविकास विभाग

ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नवीन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी मिळाली.

Cabinet Meeting | Sarkarnama

शासकीय लेखा कार्यपद्धती

अधिकाऱ्यांकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा सेवा कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी मिळाली आहे.

Cabinet Meeting | Sarkarnama

'सत्यशोधक' मराठी चित्रपट

'सत्यशोधक' हा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील मराठी चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे.

Cabinet Meeting | Sarkarnama

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र

विरारच्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी मिळाली.

Cabinet Meeting | Sarkarnama

घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत जागा खरेदीच्या अनुदानात 50 हजारांवरून एक लाखांपर्यंत वाढ करण्यात आली.

Cabinet Meeting | Sarkarnama

पाटबंधारे प्रकल्प

प्रकल्प बाधित परिमंडळातील स्थलांतरित न झालेल्या प्रकल्पग्रस्तांना रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देण्यात येणार आहे.

Cabinet Meeting | Sarkarnama

आनंदाचा शिधा

पात्र शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी मिळाली.

Cabinet Meeting | Sarkarnama

न्यायिक अधिकारी

राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त आणि सहाय्यभूत पदे निर्माण करणे तसेच बाहययंत्रणेद्वारे ती पदे उपलब्ध करुन घेण्यास मंजुरी दिली.

Cabinet Meeting | Sarkarnama

Next : IAS होण्यासाठी अभिनयाला राम राम करणारी बाल अभिनेत्री

येथे क्लिक करा