Aslam Shanedivan
भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान ऐच्छिक प्रवास विमा सुविधा देण्याचा निर्णय घेतला असून तो २७ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आला आहे.
यामुळे आता आरक्षण खिडक्यांवर अवघ्या ४५ पैशांच्या प्रीमियममध्ये १० लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण घेता येणार आहे.
आतापर्यंत आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून ई-तिकीट काढणाऱ्या प्रवाशांनाच विम्याचा पर्याय मिळत होता.
मात्रा आता आरक्षण खिडक्यांवर तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांनाही मिळणार आहे. यामुळे प्रवाशांना प्रवास विमा निवडता येईल.
या योजनेअंतर्गत रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास १० लाख रुपये आणि मृतदेहाच्या वाहतुकीसाठी १० हजार रुपयांची तरतूद आहे.
तर कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास १० लाख रुपये, अपंगत्व आल्यास कमाल ७.५ लाख रुपयांपर्यंत दिले जातील.
तसेच अपघातात जखमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागल्यास उपचारांच्या खर्चासाठी दोन लाख रुपयांपर्यंत संरक्षण देण्यात येणार आहे.
हा विमा ऐच्छिक असून तो बंधनकारक नाही. विमा घेण्यासाठी प्रवाशांना मोबाइल क्रमांक द्यावा लागेल. विम्याचा प्रीमियम केवळ डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून भरता येईल.
विमा स्वीकारलेल्या प्रवाशांना नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर विमा पॉलिसीचा तपशील पाठविण्यात येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.