IAS Astik Kumar Pandey : बारावीतील कमी गुणांमुळे चेष्टा; तरीही डगमगले नाहीत, आस्तिक कुमार पांडेंची IAS पदाला गवसणी!

सरकारनामा ब्यूरो

वर्दीबद्दल अफाट प्रेम

वर्दीवर अफाट प्रेम असणाऱ्या आस्तिक पांडे यांचे लहानपणी आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये भरती होण्याचे स्वप्न होते.

IAS Astik Pandey | Sarkarnama

IPS आस्तिक पांडेय

उत्तर प्रदेशातील गोंंडा जिल्ह्याचे आस्तिक कुमार पांडेय हे आता महाराष्ट्र केडरमध्ये कर्तव्य बजावत आहेत.

IAS Astik Pandey | Sarkarnama

उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार

उत्कृष्ट सेवेसाठी युवा अधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांना राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले होते.

IAS Astik Pandey | Sarkarnama

वडिलांची इच्छा

शाळेतील प्रगतीमुळे ते इंजिनिअर व्हावेत, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी मनाची तयारीही केली होती.

IAS Astik Pandey | Sarkarnama

कमी गुणांमुळे चेष्टा

शाळेत असताना कायम अव्वल असलेल्या आस्तिक कुमार पांडेय यांची बारावीतील कमी गुणांमुळे काही नातेवाइकांसह लोकांनी खूप चेष्टा केली हाेती.

IAS Astik Pandey | Sarkarnama

अधिकारी व्हायचेच

अभियांत्रिकी प्रवेशाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही आणि सगळ्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी IAS अधिकारी व्हायचे, असा ठाम निर्णय घेतला.

IAS Astik Pandey | Sarkarnama

विद्यापीठात चौथा रँक

IAS ची परीक्षा तयारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदव्युत्तर पदवीसाठी इतिहास विषय निवडला. विद्यापीठातून चौथा रँक मिळवत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

IAS Astik Pandey | Sarkarnama

पीएच. डी. , सेट-नेट अन् प्राध्यापक

कालांतराने पीएच. डी. करून त्यांनी सेट-नेटची परीक्षाही उत्तीर्ण केली. नंतर झारखंड अन् दिल्ली विद्यापीठात इतिहासाचे सहायक प्राध्यापक बनले.

IAS Astik Pandey | Sarkarnama

पोलिस असिस्टंट कमांडर

यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला गेले. मात्र, आयएएसमध्ये त्यांना अपयश आले. केंद्रीय पोलिस फोर्सच्या परीक्षेत यश मिळवत ते पोलिस असिस्टंट कमांडर बनले. 

R

IAS Astik Pandey | Sarkarnama

Next : सव्वा अब्ज ठेवी अन् 40 लाखांचे सोने; खासदार जया बच्चनची संपत्ती किती?

येथे क्लिक करा