सरकारनामा ब्यूरो
महाराष्ट्र केडरचे IAS कौस्तुभ दिवेगावकर हे मूळचे लातूर येथील आहेत.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून ते मराठी विषयात पदव्युत्तर झाले.
2013 बॅचचे दिवेगावकर यांनी 15 व्या रँकसह यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती.
दिवेगावकर हे लातूर महानगरपालिकेचे आयुक्त राहिले.
धाराशिवच्या जिल्हाधिकारी पदावरही त्यांनी उत्तम भूमिका बजावली.
स्मार्ट प्रकल्पाचे संचालक असताना त्यांना ‘शेतकऱ्यांचा कलेक्टर' या नावाने ओळखतात.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकत त्यांनी धाराशिवमध्ये ‘अतिक्रमणमुक्त शेतरस्ते' ही यशस्वी मोहीम राबवली होती.
कौस्तुभ दिवेगावकर यांची पुण्याच्या पशुसंवर्धन खात्यात आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
R