Roshan More
बाबू जगजीवन राम हे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच उपपंतप्रधान होते. पाच एप्रिल त्यांचा जन्मदिवस. जाणून घेऊयात त्यांचा प्रवासाविषयी.
जगजीवन राम हे बाबू नावाने परिचित होते. त्यांची संसदीय कारकिर्द ही तब्बल 50 वर्षांची होती. त्यांचा जन्म पाच एप्रिल 1908 रोजी बिहारमधील दलित परिवारात झाला.
जगजीवन राम हे दलित नेते म्हणून काँग्रेसमध्ये परिचित होते. लहानपणापासून त्यांना जातीयतेचे चटके सहन करावे लागले. महात्मा गांधींचा त्यांच्यावर प्रभाव होता.
1969 ला काँग्रेस फुटली त्यावेळी त्यांनी इंदिरा गांधींना साथ दिली. ते काँग्रेसचे अध्यक्ष देखील होते. त्यांनी संरक्षण मंत्री, कृषीमंत्री म्हणून देखील होते.
जगजीवन राम हे संरक्षण मंत्री असताना बांगलादेशाला पाकिस्तानापासून स्वातंत्र्य करण्यात आले. त्यांच्या या कार्यबद्दल बांगलादेशाने त्यांचा गौरव करत सन्मान केला.
इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केल्यानंतर त्यांनी इंदिरा गांधींची साथ सोडून काँग्रेस फाॅर डेमोक्रेसी पक्षाची स्थापना केली.
1977 च्या निवडणुकीत जगजीवन राम यांना पंतप्रधान पद मिळण्याची शक्यता होती. मात्र, त्याच वेळी त्यांच्या मुलाचे काही अश्लील फोटो समोर आले. त्यामुळे त्यांचे पंतप्रधान पद हुकल्याची आजही चर्चा आहे.
जगजीवन राम यांच्यानंतर त्यांची मुलगी मीरा कुमार यांनी त्यांचा राजकीय वारसा चालवला. त्या लोकसभेच्या माजी सभापती आहेत.