सरकारनामा ब्यूरो
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत.
फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांना किती पगार मिळतो हे जाणून घेऊयात..
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नेमका किती पगार मिळतो, याची माहिती एकनाथ शिंदे यांनी यांच्या निवडणूक शपथपत्रावरुन मिळाली आहे.
एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या शपथपत्रात त्यांच्या वेतनाचा आकडा जाहीर केला आहे.
शपथपत्रानुसार मुख्यमंत्र्यांना 3.4 लाख रुपये महिना एवढे वेतन मिळते. वेतनासोबत त्यांना भत्ताही दिला जातो. त्यात वेळोवेळी वाढही केली जाते.
प्रत्येक राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा वेतन हे वेगवेगळे असतं. वेतन किती असावे, याचा निर्णय त्या राज्यातील विधानसभा घेते.
मुख्यमंत्र्यांचे वेतन हे राज्य सरकार ठरवते. ही रक्कम विधानसभेत मंजूर केली जाते .
देशातील अन्य राज्यातील मुख्यमंत्र्यांपेक्षा महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना सर्वाधिक वेतन मिळते.