Rashmi Mane
लडाखचे प्रसिद्ध पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना हिंसा भडकवल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
त्यांच्या पाकिस्तानशी असलेल्या कथित संबंधांवरून वाद रंगला असतानाच त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो वांगचूक यांनी पतीच्या समर्थनार्थ ठाम भूमिका घेतली.
गीतांजली अंगमो या प्रसिद्ध उद्योजिका आणि समाजसेविका आहेत. त्यांनी ‘पुषण’ आणि ‘शंघाई पॉवर प्रोजेक्ट्स लिमिटेड’ या कंपन्यांची सुरुवात केली.
त्या ‘हेलिओस बुक्स’, ‘ओम हॉस्पिटल्स’, ‘ओम ट्रस्ट’ आणि ‘लव्ह युवर लिव्हर फाऊंडेशन’च्या संस्थापक आहेत.
शिक्षण क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान असून त्या ‘हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्स, लडाख’च्या संस्थापक सदस्य आहेत.
वांगचूक यांच्या पत्नीचे महाराष्ट्राशी आहे कनेक्शन त्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या (MIEB) त्या सल्लागार राहिल्या आहेत तसेच चेन्नईतील नामांकित केंब्रिज शाळेच्या प्रमुखही राहिल्या आहेत.
ओडिशातील बालासोर येथे एका पंजाबी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांनी फकीर मोहन विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदवी घेतली आणि त्यानंतर जेव्हियर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, भुवनेश्वर येथून मार्केटिंग व फायनान्समध्ये एमबीए केले.
गीतांजलि अंगमो कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहेत. 2009 साली अमेरिकेत झालेल्या विश्व स्पर्धेत त्यांनी आपल्या मुलगा आर्यनसोबत किताब जिंकला होता. ओडिसी व रशियन बॅले नृत्य, हिंदुस्थानी शास्त्रीय गायन आणि पियानो वादन यांची त्यांना विशेष आवड आहे.
भारतीय अध्यात्म, वेद-उपनिषदांचा अभ्यास त्यांनी केला आहे. त्यासोबतच नियमित योग, प्राणायाम व ध्यान साधना करतात. शिक्षण आणि समाजविकासातील कामगिरीबद्दल 2022 साली भारत सरकारने त्यांना ‘वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अवॉर्ड’ने गौरवले.