Ganesh Sonawane
महाराष्ट्र शासनाने आज कामगार कल्याण आणि प्रशासकीय प्रक्रियांच्या सुलभीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.
वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या नोंदणीकृत बांधकाम कामकागारांना आता निवृत्ती वेतन मिळणार आहे.
या योजनेत दरवर्षी 12 हजार रुपये म्हणजेच महिन्याला एक हजार निवृत्ती वेतन बांधकाम कामगारांना मिळणार आहे.
याबद्दल कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत घोषणा केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या योजनेला तत्त्वतः मंजुरी दिली आहे.
लवकरच त्यासाठी सविस्तर एसओपी तयार करण्याचे निर्देश विभागाला दिले आहेत.
या उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील कामगार कल्याण योजनांमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली आहे.
या निर्णयानंतर राज्यातील शेकडो कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
निवृत्तीनंतरही त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे भविष्य निश्चित होईल.