Deepak Kulkarni
राज्यात बारमधील 'छमछम' चं वेड असणाऱ्या 'त्या' कलाप्रेमींची संख्या प्रचंड मोठी असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे.
महाराष्ट्रात त्यामुळे तमाशा फड, कलाकेंद्र,पब यांच्यानंतर डान्सबारबद्दल आकर्षण असलेला एक मोठा वर्ग आहे.
पोलिसांच्या कारवायांमध्ये अनेकदा हॉटेल, बारमध्ये महिलांकडून अश्लील नृत्य केले जात असल्याचं समोर आलं आहे. डान्सबारमुळे अनेक कुटुंबही उद्धवस्त झाली आहे.
विधानसभेत डान्सबार सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले आहे. हे विधेयक गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सादर केले.
सरकारकडून हॉटेल वा डान्सबारमधील नृत्यांना चाप बसणार आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास या कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.
कोणत्याही हॉटेल वा बारमध्ये सरकारच्या नियमांचं तीनवेळा उल्लंघन करण्यात आले तर परवाना रद्द करण्यात येणार आहे
सरकारने या विधेयकानुसार हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारमधील लाइव्ह म्युझिक आणि ऑर्केस्ट्रा कार्यक्रमांसाठीचे परवाने पोलीस कायद्याअंतर्गत देण्याची तरतूद रद्दपातल ठरवली आहे.
राज्यातील महायुती सरकारनं शहरी तसेच ग्रामीण भागातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारमधील महिलांच्या सन्मान संरक्षणाचा मुद्दा अधोरेखित केला आहे. त्यामुळे नवीन डान्सहबार सुधारणा विधेयकात अश्लील नृत्यासंदर्भातली व्याख्या विचारात घेऊनच हे परवाने मिळणार आहे.
सरकारने राज्यातील ऑर्केस्ट्रा बारबाबत कठोर भूमिका घेतली आहे. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार चालवणाऱ्यांवर यापुढे कडक कारवाई केली जाणार असल्याचं समोर आलं आहे.