Aslam Shanedivan
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मंगळवारी (ता. 28) विमान अपघातात निधन झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.
आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत केवळ सत्तेची पदे न भूषवता प्रशासनावर पकड आणि धडाडीच्या निर्णयांनी त्यांनी आपली ओळख कामाचा माणूस अशी निर्माण केली.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी वित्त, नियोजन आणि जलसंपदा यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळत महाराष्ट्राच्या हिताचे 10 मोठे निर्णय घेतले.
त्यांनी अर्थमंत्री म्हणून जिल्ह्यांच्या निधी वितरणात वेग देत करचोरी रोखण्यासाठी कडक पावले उचलली. तसेच जीएसटी संकलनात राज्याला देशात प्रथम स्थानी ठेवले.
जलसंपदा मंत्री असताना त्यांनी कृष्णा खोरे, मराठवाडा आणि कोकणातील सिंचन प्रकल्पांना गती दिली.Ajit Pawar
क्रीडामंत्री असताना पदकविजेत्या खेळाडूंना 5 टक्के आरक्षणांतर्गत थेट सरकारी नोकरी देण्याचे धोरण आखले. 'तालुका क्रीडा संकुल' उभारण्यावर भर दिला.
ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी त्यांनी दूध संघ आणि स्थानिक बँकांवर लक्ष केंद्रित करणारी धोरणे आखलीच सोबत शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेला (AI) प्रोत्साहन दिले
अर्थमंत्री म्हणून 2024 च्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना आणत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला
राज्याच्या आर्थिक विकासासाठी त्यांनी पायाभूत सुविधा, आरोग्य आणि उद्योगांवर लक्ष केंद्रित करणारी 'पंचसूत्री' मांडली.
नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील ITI मध्ये 'पीएम सेतू' योजना आणलीच सोबत 12 वी पास ते पदवीधर सुशिक्षित बेरोजगारांसाठी इंटर्नशिपची योजना सुरू केली
पुणे मेट्रोचा विस्तारासह मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील 'मिसिंग लिंक' प्रकल्प पूर्ण केला. तर वीज दर कपात करण्यासाठी 'ग्रीन एनर्जी' धोरण आणले.