सरकारनामा ब्यूरो
महाराष्ट्रात गेल्या 64 वर्षात आतापर्यंत असे काही नेते आहेत, ज्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले, मात्र ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. कोण आहेत ते नेते पाहू..
महाराष्ट्रात सध्या सत्ता स्थापनेवरून गोंधळ सुरु आहे. राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यांकडे सगळ्यांच लक्ष लागले आहे.
त्रिपुडे हे भंडारा विधानसभेचे आमदार होते. नाशिकराव तिरपुडे हे 3 महिने उपमुख्यमंत्रीपदावर कार्यरत असणारे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री होते. त्यांची नियुक्ती महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी झाली होती. नाशिकराव हे 1983 मध्ये मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. मात्र अस झाल नाही.
सोळंके हे बीडमधील मोठे नेते होते. शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद सुंदरराव यांना दिलं. सोळंके हे 1वर्षहून अधिककाळ उपमुख्यमंत्रीपदावर कार्यरत होते. मात्र पवारांनी पद सोडताच त्यांनीही हे पद सोडले. यानंतर ते मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती,पण असे झाले नाही. 2014 मध्ये त्यांचे निधन झालं.
1983 मध्ये काँग्रेसचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी रामराव आदिक यांना उपमुख्यमंत्री पद दिले. आदिक हे मुंबईतील काँग्रेस या पक्षाच्या नेते होते. ते त्यांच्या युक्तिवादासाठी खुप प्रसिद्ध होते.1983 ते 1985 पर्यंत ते उपमुख्यमंत्री पदावर होते. ते मुख्यमंत्री होणार अस म्हटलं जात होत पण अस झाल नाही.
महाराष्ट्रात शिवसेना,भाजपचे सरकार स्थापन झाले होते, तेव्हा शिवसेनेला मुख्यमंत्रीपद तर भाजपला उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. गोपीनाथ मुंडे यांना भाजपकडून उपमुख्यमंत्रीपद दिले. मुंडे यांनी जवळ जवळ 4 वर्षे या पदाचा कार्यभाळ संभाळला.
ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ 1999 मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे सरकार स्थापन झाले. तेव्हा काँग्रेसला मुख्यमंत्रीपद आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद दिले होते.छगन भुजबळांकडे उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभाळ सोपवण्यात आला होता. पण त्यांना आतापर्यंत एकदाही मुख्यमंत्रीपद मिळाले नाही.
2003 ला उपमुख्यमंत्रीपदासाठी विजयसिंह पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांनी 2004 पर्यंत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. यानंतर काही दिवसांनी त्यांच्याकडून हे पद काढून घेतले. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार अशी चर्चा सगळीकडे होती परंतु अस न होता.
सांगली जिल्ह्यातील आर. आर. पाटील यांना शरद पवारांनी 2004 मध्ये उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली होती. 2008 च्या मुंबई हल्ल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. शरद पवारांचे विश्वासू नेते म्हणून पाटील यांची ओळख होती.
अजित पवार 2023 मध्ये राज्याचे आठवे उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदावर काम केले आहे.