Rashmi Mane
राजकारण वेगळं, नाती वेगळी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असली, तरी पवार कुटुंबात फूट पडलेली दिसून येत नाही.
पवार कुटुंबीय दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येताना दिसलं आहे.
मागच्या आठवड्यातच प्रतापराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने पवार कुटुंबीयांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र जमले आहेत.
राजकारणात पवार कुटुंबाची एक वेगळी ओळख आहे.
सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
पवार कुटुंबीयांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.