Jagdish Patil
सिक्कीममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले आहे.
रिंबी गावात डोंगरावरील माती, दगड आणि मलबा खाली आल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
या भूस्खलनाच्या तडाख्यात अनेक घरे आणि वीज विभागाचे सहा क्वार्टर बाधित झाली आहेत.
काही घरे आणि क्वार्टर मलब्यासोबत वाहून गेलेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सततच्या पावसामुळे डोंगराचा भाग खचला आणि मोठ्या प्रमाणात माती व दगड खाली आले आहेत.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासन आणि स्थानिक पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आहे.
आतापर्यंत 128 हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
तर पुन्हा भूस्खलन शक्यता असलेल्या भागांत न जाण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
भूस्खलनाचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला असून रिंबी-खेचुपेरी मार्ग बंद झाला आहे.
सिक्कीमचे CM प्रेमसिंह तमांग यांनी भूस्खलनाच्या घटनेबाबत चिंता व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत.