Pradeep Pendhare
एल निनोमुळे पावसाने ओढ दिली असून, राज्यात पाऊस झालेला नाही. परिणामी धरणे, तलाव आणि लहान जलस्रोतांमधील पाणीसाठा गायब झाला आहे. मराठवाड्यातील नदी, तलाव कारडे पडलेत.
सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी आणि हरभरा यांसारख्या पिकांच्या उत्पादनावर दुष्काळाचा गंभीर परिणाम झाला आहे.
ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, विहिरींची खालावणारी पातळी आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. 15 जिल्ह्यांतील 633 गावे आणि 1652 वाड्यांना एकूण 706 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे पशुपालकांसमोर मोठे संकट उभे राहिले असून, हिरवा चारा, पाण्याची उपलब्धता आणि पशुधन जगवण्याचा खर्च वाढू लागला आहे. 3,321 विहिरींमध्ये भूजल पातळी घट नोंदवली गेली आहे.
दुष्काळामुळे मजुरांचे स्थलांतर वाढले आहे. शेतीची कामे कमी झाल्यास शेतमजूर, ऊसतोड कामगार आणि ग्रामीण कुटुंबांच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे.
भाजीपाला, धान्य आणि डाळींच्या उत्पादनावर परिणाम झाल्यास सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे गणित बिघडू लागले आहे.
पाऊस नसल्याने भूगर्भीय पाणी पातळीवर परिणाम झाला असून, बोअरवेल आणि विहिरींनीही तळ गाठला आहे. भूजल पातळीची घसरण होऊन, भविष्यातील पाणीटंचाईचे गडद झाली आहे.
महागाईत उत्पादनावर परिणाम झाल्याने कर्जाचा डोंगर आणि उत्पन्न शून्य! अशा परिस्थितीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पीककर्ज, बँकांचे हप्ते, खासगी सावकार आणि पीकविमा, असे गंभीर प्रश्न निर्माण झालेत.
दुष्काळामुळे सरकार अलर्ट झाले असून, विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे. यात पीक नुकसानभरपाई, कर्जवसुली स्थगिती, वीजबिल सवलत, चारा छावण्या आणि रोजगार हमी योजनांचा आढावा सुरू करण्यात आला आहे.
दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारकडून जलसंधारण, शेततळी, ठिबक सिंचन, पाण्याचा काटकसरीने वापर आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर काम सुरू करण्यात आले आहे.