Pradeep Pendhare
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी जाहीर केलेल्या दरावरून शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी नाराज आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दरांकडे पाहू.
2026-27 हंगामासाठी केंद्र सरकारने 3650 रुपये प्रतिटन FRP निश्चित केली आहे. हा दर 10.25 टक्के साखर उताऱ्याच्या निकषावर आहे. उतारा वाढल्यास FRP मध्येही वाढ होते.
पहिली उचल 3900 प्रतिटन आहे. याशिवाय हंगाम संपल्यानंतर 100 रुपये आणि पुढील हंगामापूर्वी अटींच्या अधीन 200 रुपये देण्याचे सूत्र मान्य झाले. एकूण संभाव्य दर 4200 रुपयापर्यंत आहे.
सातारा जिल्ह्यातील सात प्रमुख कारखान्यांनी पहिली उचल म्हणून 3800 रुपये देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र शेतकरी संघटना कोल्हापूर पॅटर्नची मागणी करत आहेत.
सोलापुरात काही कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली असले, तरी कारखान्यांचे दर अद्याप जाहीर झालेले नाहीत. शेतकरी संघटनेकडून 3500 रुपयांच्या पहिल्या उचलीची मागणी आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील सात कारखान्यांनी पहिली उचल 3100–3200 रुपयापर्यंत जाहीर केला आहे. थोरात आणि काळे कारखाने 3200 रुपये, तर ज्ञानेश्वर, अशोक, मुळा, ढाकणे आणि अगस्ती 3100 रुपये दर दिला आहे.
अहिल्यानगरमध्ये ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधी प्रतिटन 4000 रुपये दराची मागणी लावून धरली आहे. 11 कारखान्यांच्या दराची प्रतीक्षा आहे.
मराठवाड्यातील काही कारखान्यांनी पहिली उचल 3000–3350 रुपयांपर्यंत या दरम्यान जाहीर केली आहे. मराठवाड्यातील अनेक कारखान्यांकडे मागील हंगामातील देणीही प्रलंबित आहेत.
साखर उतारा, कारखान्याची आर्थिक स्थिती, ऊस तोडणी आणि वाहतूक खर्च, साखरेचे बाजारभाव, शेतकरी संघटनांच्या आंदोलनाच्या दबावामुळे ऊसाच्या दरांमध्ये फरक आढळतो.
ऊस वजन झाल्यानंतर FRPची रक्कम 14 दिवसांत देणे बंधनकारक आहे. विलंब झाल्यास वार्षिक 15 टक्के व्याजाची तरतूद असून, तोडणी-वाहतूक खर्च आणि उताऱ्याचा हिशेबही तपासणे महत्त्वाचे आहे.