Pradeep Pendhare
पीक नुकसान मदत, शेती अनुदान, पीकविमा, रोजगार आणि बचत गटांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी पात्रतेनुसार मिळवता येऊ शकते.
योजनांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राच्या महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र आवश्यक आहे. लाभ घेण्यासाठी प्रत्यक्ष शेती, रहिवास आणि इतर अटी तपासल्या जातात.
पात्र शेतकरी कुटुंबांना तीन हप्त्यांत वार्षिक 6,000 रुपये मिळतात. महिला शेतकऱ्यांनी जमीन नोंदी, लाभार्थी स्थिती आणि योजनेच्या अटी माहिती करून घ्याव्यात.
महाडीबीटीवर ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि इतर उपलब्ध कृषी घटकांचा लाभ मिळवता येऊ शकतो. दुष्काळात पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते.
उमेद अभियान आणि बचत गटांच्या माध्यमातून प्रशिक्षण, बँक कर्ज-जोडणी आणि पात्र प्रकल्पांसाठी अर्थसहाय्याच्या संधी उपलब्ध करता येऊ शकते. शेळीपालन, दुग्धव्यवसाय आणि अन्नप्रक्रिया येथे देखील संभाव्य पर्याय आहेत.
ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड, कामाची मागणी आणि गावातील मंजूर कामांची माहिती ग्रामपंचायती मिळवता येऊ शकते.
पात्र महिलांना योजनेच्या लागू अटींनुसार दरमहा 1,500 हजार रुपये मिळू शकतात. ही स्वतंत्र दुष्काळ मदत नसून महिला आर्थिक सहाय्य योजना आहे.
दुष्काळ मदतीसाठी पीक नुकसान व मदत: तलाठी किंवा तहसील कार्यालय, कृषी अनुदान: कृषी सहाय्यक किंवा महाडीबीटी, महिला शेतकरी प्रमाणपत्र: अधिकृत पोर्टल आणि बचत गट: ग्रामसंघ किंवा उमेद अभियानात अर्ज करता येईल.
पात्रता आणि अर्जाची सद्यस्थिती अधिकृत पोर्टलवर तपासावी. ही माहिती गरजू शेतकरी महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेबस्टोरी शेअर करता येईल.