E Bike Taxi Service : महाराष्ट्रात ई-बाइक टॅक्सीची एंट्री! मुंबई-पुण्यासह 35 शहरांत लवकरच सेवा; जाणून घ्या नियम...

Aslam Shanedivan

ई-बाइक टॅक्सी

राज्यात लवकरच ‘ई-बाइक टॅक्सी’ची सेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत. ‘ई-बाइक टॅक्सी’ला प्रवासी संवर्गातील नंबरप्लेट लागणार आहे

E Bike Taxi Service | Sarkarnama

परिवहन विभाग

याबाबतची यंत्रणा ‘नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर’ने (एनआयसी) तयार केली असून लवकरच नोंदणी प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिलीय.

E Bike Taxi Service | Sarkarnama

३५ शहरांत सेवा

ही सेवा मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीसह राज्यातील ३५ शहरांत ‘ई-बाइक टॅक्सी’सेवा सुरू करण्यात येणार आहे.

E Bike Taxi Service | Sarkarnama

एकच प्रवासी

कंपन्यांना केवळ ‘ई-बाइक’च वापराव्या लागतील. एका वेळी एका बाइकवर एकच प्रवासी नेण्याची अनुमती असेल

E Bike Taxi Service | Sarkarnama

बाइकचालकाचे वय

बाइकचालकाचे वय २० ते ५० वर्षे असेल ५० वर्षांवरील वयाच्या चालकांना परवानगी असणार नाही

E Bike Taxi Service | Sarkarnama

यांना लाभ नाही

तर १२ वर्षांखालील प्रवाशांना बाइक टॅक्सी सेवेचा लाभ घेता येणार नाही

E Bike Taxi Service | Sarkarnama

पिवळी नंबरप्लेट

‘बाइक टॅक्सी’साठी पिवळी नंबरप्लेट असणार आहे. नव्या यंत्रणेत त्याबाबतचा समावेश करण्यात आला आहे.

E Bike Taxi Service | Sarkarnama

कुणाला फरपटत नेलं, तर कुणी बॅरिकेड्सवर चढलं; दिल्ली जाम केलेल्या CJP आंदोलनाचे अंगावर काटा आणणारे PHOTO आले समोर

आणखी पाहा