Electricity Bill : सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा! वीज दरात मोठी कपात; प्रति युनिटमागे किती रूपये द्यावे लागणार?

Aslam Shanedivan

राज्य सरकार

ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Electricity Bill | Sarkarnama

वीज दरात कपात

राज्य सरकारने वीज दरात मोठी कपात करणारा निर्णय घेतला असून १ एफ्रिलपासून नवीन दर लागू होणार आहेत.

Electricity Bill | Sarkarnama

चारही टप्प्यांत कपात

नवीन वीज दरानुसार, विजेच्या वापराच्या सर्व चारही टप्प्यांमधील दरामध्ये कपात करण्यात आली आहे.

Electricity Bill | Sarkarnama

वीज दर कमी

महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या कंपन्यांनी घरगुती वीज दरांमध्ये कपात केली असून १० ते १४ टक्क्यांनी वीज दर कमी होणार आहे.

Electricity Bill | Sarkarnama

खिशावरील ताण

वीज दरामध्ये कपात केल्यामुळे राज्यातील सर्वसामान्यांसाठी नवीन आर्थिक वर्ष दिलासादायक ठरणार असून परिणामी खिशावरील ताण कमी होणार आहे

Electricity Bill | Sarkarnama

१०० पर्यंत

वीज दर कपातीच्या निर्णयानुसार, ० ते १०० युनिट्सपर्यंतच्या वापरासाठी ९.७ टक्के कपात करण्यात आली असून आता ४.७६ रुपयांऐवजी ४.३० रुपये द्यावे लागतील

Electricity Bill | Sarkarnama

१०१ ते ५०० पर्यंत

१०१ ते ३०० युनीटसाठी (१०.८ टक्के कपात) ७.१० रुपये मोजावे लागतील. तर ३०१ ते ५०० युनीटसाठी १४ टक्के कपात प्रमाणे आता ११.६४ रुपये मोजावे लागतील.

Electricity Bill | Sarkarnama

५०० पेक्षा अधिक

तर ५०० पेक्षा अधिक युनीटमध्ये १३.१ टक्के कपात करण्यात आली असून १४.५५ रुपयांऐवजी १२.६४ रुपये द्यावे लागणार आहेत.

Electricity Bill | Sarkarnama

PAN, ITR Update : 1 एप्रिलपासून आयकर, PAN, ITR काय बदल होणार? जाणून घ्या!

आणखी पाहा