सरकारनामा ब्यूरो
मनोहर जोशी यांची ओळख बाळासाहेबाचे 'कडवट' नेते म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात होती.
मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. जोशी हे मध्यमवर्गीय कुटुंबातले असल्याने त्यांचे बालपण गरिबीत गेले.
मनोहर जोशी शिक्षणासाठी मुंबईला गेले होते . तेथे त्यांनी मुंबई विद्यापीठातून M.A. L.L.B ही पदवी घेतली.
मुंबई महानगरपालिकेत त्यांनी लेखनिक या पदावर तात्पुरती नोकरी केली. पण जोशींना नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्याची आवड होती. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेणे सोपे व्हावे यासाठी त्यांनी 1967 मध्ये कोहिनूर इन्स्टिट्यूटची स्थापना केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. यानंतर मात्र त्यांनी पुन्हा मागे वळून न पाहता राजकारणात उंची गाठली.
शिवसेनेचे नेते म्हणून विधानपरिषदेवर पहिल्यांदा निवडून येत त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरुवात केली. 1976 ते 1977 यादरम्यान ते मुंबईचे महापौर होते.
14 मार्च 1995 ते 31 जानेवारी 1999 या कालावधीत ते महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द गाजवली. ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते. 1999 ते 2004 या कालावधीत लोकसभेचे अध्यक्ष होते.
शिवसेनेत धडाडीचे काम करणारे तसेच महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणारा 'पाणीदार' मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेचा प्रकल्प जोशी यांच्या काळात तयार झाला. मुंबईमध्ये अनेक उड्डाणपूल उभारण्यात आले. गरीब आणि होतकरु लोकांसाठी एक रुपयात झुणका-भाकर ही योजनाही त्यांच्याच काळात सुरू झाली.
ता. 23 फेब्रुवारी 2024 रोजी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये मनोहर जोशीचं निधन झालं.