Ganesh Sonawane
राज्यातील फडणवीस सरकारने 30 जून 2026 पूर्वी शेतकरी कर्जमाफी करण्याचा शब्द दिला होता.
परंतु सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कर्जमाफी आचारसंहितेच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता होती.
मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने कर्जमाफीला आचारसंहितेतून विशेष सूट दिली आहे.
त्यामुळे 30 जून पूर्वी कर्जमाफी होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शेतकरी आनंदित आहे.
कर्जमाफीच्या योजनेचा ३० ते ४० लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
काही महिन्यांपूर्वी सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती.
या कर्जमाफी अंतर्गत नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहेत.
तसेच आर्थिक संकटात सापडलेल्या आणि बँकेचे कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे.