Jagdish Patil
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात ॲनालॉग पनीरवर बंदी घातली आहे.
या निर्णयानंतर 'ॲनालॉग पनीर'ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र हे पनीर नेमकं काय असतं? ते जाणून घेऊ.
पारंपरिक पनीर हे दूधापासून बनवलं जातं, पण ॲनालॉग पनीर हे दिसायला, चवीला पनीरसारखंच असलं तरी ते बनवण्याची प्रक्रिया वेगळी असते.
ॲनालॉग पनीर हे केवळ दूधापासून बनवत नाहीत तर त्यासाठी वनस्पती तेल, दूध पावडर, स्टार्च आणि इतर खाद्यसामग्रीचा वापर करतात.
अनेक रेस्टॉरंट्स आणि प्रोसेस्ड फूड बनवणाऱ्या कंपन्या कमी खर्चात आणि एकाच प्रकारची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी हे पनीर वापरतात.
ॲनालॉग पनीर हे बनावटच असतं असं नाही, ठरलेल्या खाद्यमानकांनुसार ते बनवल्यास त्याला अवैध म्हणता येत नाही.
ॲनालॉग पनीरमध्ये प्रोसेस्ड फॅट, मीठ किंवा दुसरे एडिटिव्स जास्त प्रमाणात असतील, तर त्याचं वारंवार सेवन करणं आरोग्यासाठी चांगलं नाही.
परंतू ते खाद्यमानकांनुसार योग्य पद्धतीने बनवलं असेल तर ते सेवन करण्यास सुरक्षित असू शकतं.
मात्र, FDA च्या चाचणीदरम्यान या पनीरचे अनेक नमुने निकृष्ट दर्जाचे आणि आरोग्यासाठी असुरक्षित असल्याचे आढळून आले.
त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली. अस्सल पनीर हे दुधापासून बनवलं जातं. ज्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि आवश्यक पोषक तत्वे असतात.
याउलट ॲनालॉग पनीरमध्ये दुधाची पोषक तत्त्वे कमी किंवा अजिबात नसतात.
अस्सल पनीरला दुधाळ सुगंध असतो आणि ते अत्यंत मऊ असते, ॲनालॉग पनीर रबरासारखं आणि कमी मऊ असते.