Deepak Kulkarni
महाराष्ट्र सरकारने 'अन्नपूर्ती' धान्य एटीएम ही एक स्वयंचलित धान्य वितरण प्रणाली आहे.
महाराष्ट्रातील पहिल्या 'अन्नपूर्ती धान्य एटीएम'चे उद्घाटन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिक येथे शनिवारी (ता. १७ ऑक्टोबर) करण्यात आले.
सरकारच्या सार्वजनिक रेशन धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेला एटीएम हा एक स्वयंचलित पर्याय आहे.
नाशिकरोड येथील सरकारी धान्य गोदामात राज्यातील पहिलं अन्नपूर्ती एटीएम मशीन बसवण्यात आले आहे.
या धान्य एटीएममुळे रेशन दुकानांवरील ग्राहकांना लागणाऱ्या लांबच लांब रांगा आणि तांत्रिक अडचणींचा मनस्ताप सहन करावा लागणार नाही.
अन्नपूर्ती हे एटीएम मशीन अवघ्या ३५ सेकंदात २५ किलो धान्य अचूक मोजमापासह वितरित करू शकणार आहे.
आता यापुढे ग्राहकांना रेशन दुकानदारांच्या ठराविक वेळा पाळण्याची आवश्यकता नसणार आहे.हे केंद्र लाभार्थ्यांसाठी २४ तास खुले राहील.
या मशीनची क्षमता ३० क्विंटल (३००० किलो) असून, यामध्ये सध्या गहू आणि तांदूळ उपलब्ध करून दिले जातील.
वीज पुरवठा खंडित झाल्यास काम थांबू नये म्हणून या यंत्राला सौर ऊर्जेची जोड देण्यात आली आहे.