सरकारनामा ब्यूरो
भिवंडीतील मराडे पाडा या ठिकाणी शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. हे महाराष्ट्रातील पहिलेच मंदिर असल्याचा दावा करण्यात येत आहे.
या मंदिराचे लोकार्पण 17 मार्च या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अयोध्यातील रामलल्लाची मूर्ती घडविणारे मूर्तीकार अरुण योगी यांनी तयार केली आहे.
सहा फूट उंच असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती काळ्या पाषाणातून घडविण्यात आली आहे.
मंदिर परिसरात महाराजांच्या जीवनचरित्रावरील अनेक प्रसंगाचे शिल्पचित्रे तयार करण्यात आले आहेत.
त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगाची माहिती शिवप्रेमींसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी असा भाषेमध्ये देण्यात आली आहे.
मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, स्वामी गोविंदगिरी महाराज यांचीही उपस्थिती असणार आहेत.