Mangesh Mahale
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या विराजमान झाल्या आहेत.
ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील आणि शरद पवार यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीमुळे सुनेत्रा आणि अजित पवार यांचा विवाह ठरला. पद्मसिंह पाटील त्यांचे भाऊ आहेत.
सुनेत्रा पवार यांना लहानपणापासूनच राजकारण आणि समाजकारणाचा वारसा मिळाला होता.
१९८५ मध्ये विवाहानंतर सुनेत्रा पवार बारामतीत स्थायिक झाल्या. त्या काळात अजित पवार यांनी राजकारणात पाऊल टाकले नव्हते.
अजितदादांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात सुनेत्रा पवार यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत अजित पवार यांना व्यवसायातही मोलाची साथ दिली.
राज्यसभेवर खासदार म्हणून गेलेल्या सुनेत्रा पवार सुरुवातीची अनेक वर्षं पवार कुटुंबियांसाठी बारामतीच्या प्रचाराची धुरा कायमच त्यांच्याकडे होती.
मुलगा पार्थ पवार मावळ मधून लोकसभेच्या निवडणुकीला उभा राहिला त्यानंतर सुनेत्रा पवार राजकारणात सक्रिय झाल्या.
2024 मध्ये आधी लोकसभा निवडणुकीत त्या नणंद सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या. त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्या राज्यसभेत खासदार झाल्या.
सुनेत्रा पवारांनी एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया ही सामाजिक संस्था स्थापन केली. या माध्यमातून त्या पर्यावरणाशी निगडित काम करत आल्या आहेत.
2006 पासून टेक्सटाईल पार्कचे अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे. विद्या प्रतिष्ठान या संस्थेवरही विश्वस्त म्हणून काम करत आहेत.
सुनेत्रा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्या महाराष्ट्राच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहे.