Fadnavis Government : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! पशुपालकांसाठी नियमात बदल, पुरात मृत जनावरांसाठी मिळणार 'इतकी' मदत

Aslam Shanedivan

अतिवृष्टी

राज्यात गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीतने शेतकऱ्यांसह पशुपालकांचे मोठे नुकसान झाले होते

Devendra Fadnavis farmer relief scheme livestock damage | Sarkarnama

दुधाळ जनावरे

दुधाळ जनावरे मृत किंवा बेपत्ता झाली होती. तर कुक्कुटपक्षांचेही नुकसान झाले होते. यामुळे अत्यल्प भूधारक तसेच भूमिहीन पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.

Devendra Fadnavis farmer relief scheme livestock damage | Sarkarnama

फडणवीस सरकार

पण आता फडणवीस सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.

Devendra Fadnavis farmer relief scheme livestock damage | Sarkarnama

राज्य सरकार

मृत पावलेल्या जनावरांच्या मर्यादेची अट शिथिल करण्यात आली असून पुरात मृत पावलेल्या सर्व जनावरांसाठी मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.

Devendra Fadnavis farmer relief scheme livestock damage | Sarkarnama

अशी मिळेल मदत

पडझड आणि नष्ट झालेल्या गोठ्यांसाठी 3 हजार रुपये मिळणार असून मृत दुधाळ जनावरांसाठी प्रति जनावर 37 हजार 500 रुपये जाहीर.

Devendra Fadnavis farmer relief scheme livestock damage | Sarkarnama

ओढकाम करणारे जनावर

ओढकाम करणाऱ्या जनावरांच्या मृत्यूसाठी 32 हजार रुपये मिळणार. तर मृत पावलेल्या लहान जनावरांसाठी 20 हजार रुपयांची घोषणा.

Devendra Fadnavis farmer relief scheme livestock damage | Sarkarnama

शेळी-मेंढी आणि...

प्रति शेळी आणि मेंढीसाठी 4 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून कुक्कुटपालन करणाऱ्यांना प्रति कोंबडी 100 रुपये दिले जाणार आहेत.

Devendra Fadnavis farmer relief scheme livestock damage | Sarkarnama

Iran Uranium : इराणकडे 400 किलो युरेनियम; अणुबाॅम्बसाठी किती किलो लागतं युरेनियम?

आणखी पाहा