Jagdish Patil
रत्नाप्पा कुंभार भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यसैनिक होते. भारताच्या घटना मसूदा समितीचे सदस्य व घटनेच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींपैकी एक होते. ते पहिल्या लोकसभेचे खासदार, विधानसभेत 6 वेळा निवडून गेलेले आमदार व महाराष्ट्र सरकारमधील मंत्री होते.
वसंतदादांचा जीवन प्रवास क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी असा राहिलेला आहे.
यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी उपपंतप्रधान होते. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय भूमिका बजावली ब्रिटिशांच्या राजवटीला विरोध करत लोकांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित केले.
स्वामी रामानंद तीर्थ हे एक भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते होते त्यांनी हैदराबाद मुक्ती चळवळीचे नेतृत्व केले. ते हैदराबाद प्रदेश काँग्रेसचे प्रमुख नेते होते.
डॉ. शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. ते स्वामी रामानंदतीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले होते.
क्रांतिसिंह नाना पाटील स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते. ते महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक मानले जातात.
ब्रिटिशांची प्रशासन यंत्रणा खिळखिळी करण्यात जी. डी. बापू आघाडीवर होते. क्रांतिसिंहांच्या प्रतिसरकारसाठी काम करताना सर्वाधिक पत्री ठोकण्याचा पराक्रम त्यांच्या नावावर आहे. 1957 ला विधानसभेवर, तर 1962 ला त्यांनी शेकाप तर्फे विधान परिषदेवर त्यांची निवड झाली.
तात्यासाहेब कोरेंना सहकारमहर्षी म्हणून ओळखलं जातं. ते एक प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक होते. ते यशवंतराव चव्हाणांचे निकटचे सहकारी होते. त्यांनी सहकार चळवळीतून ग्रामोद्धार तत्त्वांचा पुरस्कार केला.