Jagdish Patil
यंदा भारत-पाकिस्तानच्या स्वातंत्र्याला 79 वर्षे पूर्ण होतायत. पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करत असला तरी इतिहासात दोन्ही देशांच्या स्वातंत्र्याची तारीख 15 ऑगस्ट आहे.
फेब्रुवारी 1947 मध्ये, ब्रिटिश पंतप्रधान अॅटली यांनी लॉर्ड लुईस माउंटबॅटन यांची व्हाइसरॉय म्हणून नियुक्ती करत 30 जून 1948 पर्यंत भारताची सत्ता भारतीय नेत्यांकडे सोपविण्याचा आदेश दिला.
मात्र, वाढत्या हिंसाचाराच्या भीतीने त्यांनी हा कालावधी ऑगस्ट 1947 पर्यंत कमी करत लवकर स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला.
18 जुलै 1947 रोजीच्या भारतीय स्वातंत्र्य कायद्यात स्पष्टपणे म्हटं होते की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत आणि पाकिस्तान दोन स्वतंत्र अधिराज्य म्हणून अस्तित्वात येतील.
त्यामुळे दोन्ही देशांना कायदेशीररित्या 15 ऑगस्टलाच स्वातंत्र्य मिळाले. पाकच्या पहिल्या टपाल तिकिटावरही 15 तारीख लिहिलेली. तर जिनांनी 15 ऑगस्ट पाकिस्तानचा वाढदिवस असल्याचं म्हटलं होतं.
सत्ता हस्तांतरणाची वेळ वेगवेगळी होती. माउंटबॅटन यांनी 14 ऑगस्ट 1947 रोजी सकाळी पाकिस्तानला सत्ता सोपवली आणि मध्यरात्री भारताची सत्ता हस्तांतरित केली.
मात्र, 1948 मध्ये, पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाकिस्तानी मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वातंत्र्य दिनाची तारीख बदलण्याचा प्रस्ताव आला.
यामागे 2 कारणे होती. एक म्हणजे पाकिस्तानचे नेते भारताप्रमाने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यास तयार नव्हते. तर 14 ऑगस्ट 1947 हा रमजानचा 27 वा दिवस होता.
रमजान इस्लाममध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे जिनांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.