महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू ; बेकायदेशीर धर्मांतरावर किती वर्षांची शिक्षा?

Ganesh Sonawane

कायदा

महाराष्ट्रात बेकायदेशीर आणि सक्तीच्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, 2026' लागू करण्यात आला आहे.

Maharashtra Freedom of Religion Act, 2026

लागू

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी मिळाल्यानंतर आणि अधिकृत राजपत्रात (गॅझेट) प्रकाशित झाल्यानंतर आता राज्यात हा कायदा लागू झाला आहे.

Maharashtra Freedom of Religion Act, 2026

अंमल

हा कायदा 30 जुलै रोजी अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाला आणि त्याच तारखेपासून तो अंमलात आला.

Maharashtra Freedom of Religion Act, 2026

मंजूरी

हा कायदा विधिमंडळाने मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर केला होता आणि त्यानंतर तो मंजुरीसाठी राज्यपाल व नंतर राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला होता.

Maharashtra Freedom of Religion Act, 2026

प्रतिबंध

हा कायदा बळजबरी, फसवणूक, आमिष, चुकीची माहिती किंवा लग्नाचे आश्वासन देऊन केल्या जाणाऱ्या धर्मांतरास प्रतिबंध करतो.

Maharashtra Freedom of Religion Act, 2026

कारावास

या कायद्याचे उल्लंघन केल्यास 7 वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे. तर पुन्हा गुन्हा करणाऱ्यांसाठी ही शिक्षा 10 वर्षांपर्यंत वाढू शकते.

Maharashtra Freedom of Religion Act, 2026 | Sarkarnama

पूर्वसूचना

धर्मांतरापूर्वी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना 60 दिवस आधी सूचना देणे यात अनिवार्य करण्यात आले आहे.

Maharashtra Freedom of Religion Act, 2026

पालकांना अधिकार

तसेच धर्मांतरित व्यक्तीचे पालक, भावंडे आणि इतर नातेवाईक यांना तक्रार करण्याचा अधिकारही यात देण्यात आला आहे.

Maharashtra Freedom of Religion Act, 2026

NEXT : मुख्यमंत्री कार्यालयाला नवा पत्ता! 'या' आलिशान इमारतीतून चालणार महाराष्ट्राचा कारभार

येथे क्लिक करा