PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट; 21वा हप्ता थेट खात्यात, पण 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ!

Rashmi Mane

पीएम किसान योजना

सरकारने पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्टला जारी केला आहे. पुढील म्हणजे 21वा हप्ता साधारणतः 3 ते 4 महिन्यांनंतर मिळण्याची शक्यता आहे.

Sarkarnama

कोणाला मिळणार हप्ता

21वा हप्ता त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे, ज्यांच्या आधीच्या हप्त्यात कोणतीही गडबड आढळलेली नाही, ई-केवायसी पूर्ण आहे आणि जमिनीचा रेकॉर्ड योग्य आहे. तसेच वैध शेतकरी कार्ड असणेही आवश्यक आहे.

PM Kisan 2025 | Sarkarnama

कोणाला मिळणार नाही हप्ता

ज्यांचे कागदपत्र अपूर्ण आहेत, ई-केवायसी प्रलंबित आहे किंवा जमिनीचा रेकॉर्ड चुकीचा आहे, त्यांना या वेळी हप्ता मिळणार नाही. अशा लाभार्थ्यांचे नाव यादीतून वगळले जाईल.

PM Kisan 2025

शेतकरी आयडीची गरज

सरकारच्या नव्या नियमानुसार, वैध शेतकरी आयडीशिवाय कोणत्याही शेतकऱ्याला पीएम किसान योजनेत अर्ज किंवा लाभ घेता येणार नाही. हा बदल फसवणूक रोखण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी करण्यात आला आहे.

PM Kisan Yojana | Sarkarnama

शेतकरी आयडी कसा मिळवायचा?

शेतकरी आयडी मिळवण्यासाठी जवळच्या कृषी कार्यालयात किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये नोंदणी करा. यासाठी आधार कार्ड, जमिनीचे कागदपत्रे, आणि बँक तपशील आवश्यक आहेत.

Digital Agriculture Mission | Sarkarnama

नोंदणीचे पर्याय –

  1. स्वतः ऑनलाईन नोंदणी

  2. CSC केंद्रावर मदतीने नोंदणी

  3. राज्यातील कृषी/महसूल अधिकारीमार्फत नोंदणी

  4. स्थानिक अधिकाऱ्यांच्या सहाय्याने नोंदणी

PM Kisan Yojana | Sarkarnama

ई-केवायसी बंधनकारक

21वा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. हे PM Kisan वेबसाइटवर आधार क्रमांक टाकून ओटीपीद्वारे करता येते किंवा CSC केंद्रावर जाऊनही पूर्ण करता येते.

PM Kisan Yojana | Sarkarnama

लाभार्थी यादी कशी तपासावी

PM Kisan पोर्टलवरील ‘Beneficiary Status’ विभागात जाऊन आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाका. यामुळे तुम्हाला तुमचा हप्ता स्टेटस आणि नाव यादीत आहे की नाही, हे समजेल.

kisan yoajana | Sarkarnama

Next : या' अ‍ॅपवर अर्ज करा, मिळवा संपूर्ण वर्षाचा FASTag पास 

येथे क्लिक करा