Akshay Sabale
उद्योगपती रतन टाटा यांचे 86 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रूग्णालयात उपचार सुरू होते.
महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर 2023 पासून उद्योगरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला.
उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी आता ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाचा हा पहिला ‘उद्योगरत्न पुरस्कार’ रतन टाटा यांना देण्यात आला होता.
राज्य सरकारनं या पुरस्काराचे नाव बदलून उद्योगरत्न रतन टाटा, असं ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.
मुंबई येथे उद्योग भवनत बनवण्यात येत आहे. त्यालाही रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार आहे.