Roshan More
तरुणांसाठी रतन टाटा हे आयडाॅल आहेत. त्याचे विचार हे तरुणासाठी प्रेरणादायी असतात. त्यांचे विचार तरुणांना नवी दिशा देतात.
जर तुम्हाला चालायचे असेल तर एकटे चाला पण तुम्हाला दूरपर्यंत जायचे असेल तर सोबत चाला.
योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही. मी निर्णय घेतो आणि मग ते योग्य बनवतो.
लोखंडाला कोणीही नष्ट करू शकत नाही, परंतु स्वतःचा गंज त्याचा नाश करू शकतो. त्याचप्रमाणे माणसाची स्वतःची मानसिकता त्याला नष्ट करू शकते.
ज्या दिवशी मी स्वत:हून काही करू शकणार नाही, त्या दिवशी मी माझं सामान आवरेन आणि निघून जाईन!
आयुष्यातील चढ-उतार हे आपल्याला पुढे जाण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात कारण ईसीजीमध्ये सरळ रेषेचा अर्थ आपण जिवंत नाही, असा होतो.
भारताच्या भविष्याबद्दल मला नेहमीच खूप आत्मविश्वास आणि खूप उत्सुकता आहे. मला वाटते की हा खूप क्षमता असलेला एक महान देश आहे.
सहानुभूती आणि दयाळूपणा ही एखाद्या नेतृत्वाची सर्वोच्च ताकद असते!
यशस्वी लोकांचे मी कौतुक करतो. पण यश जर निर्दयीपणे मिळाले असेल तर मी त्या व्यक्तीचे कौतुक करू शकतो परंतु त्याचा आदर करू शकत नाही.
लोक तुमच्यावर जे दगड फेकतात त्याच दगडांचा वापर स्मारक बांधण्यासाठी करा.
तुमची चूक तुमची एकट्याची आहे, तुमचे अपयश एकट्याचे आहे, त्यासाठी कोणाला दोष देऊ नका. आपल्या चुकांमधून शिका आणि आयुष्यात पुढे जा.