Roshan More
विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघातील महाराष्ट्रातील महिला खेळाडूंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन्मान केला. महिला क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अमोल मुझूमदार यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने रोख रक्कमेचा धनादेश देण्यात आला.
महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिला दोन कोटी 25 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
सेमीफायनलमध्ये शतकी खेळी करणाऱ्या जेमिमा राॅड्रिग्स हिला देखील दोन कोटी 25 लाख धनादेश देण्यात आला.
फिरकीपटू राधा यादव हिने संपूर्ण स्पर्धेत 15 विकेट घेतले. तिला देखील दोन कोटी 25 लाख धनादेश देण्यात आला.
संघाचे प्रशिक्षक अमोज मुझुमदार यांना 22 लाख 50 हजार लाखांचा चेक प्रदान करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महिला क्रिकेटपटूंचा सार्थ अभिमान आहे.