Maratha Reservation : मराठा आरक्षण अध्यादेशाची घोषणा अन् आंदोलकांमध्ये जल्लोषाचे वातावरण!; पाहा खास फोटो!

Rashmi Mane

आंदोलकांचा जल्लोष

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अखेर मोठा यश मिळालं आहे.

मागण्या मान्य

सरकारने त्यांच्या बहुतेक मागण्या मान्य केल्या असून त्याबाबतचे पत्र उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी जरांगे यांना सुपूर्द केले.

तीन मागण्या तातडीने लागू

पाच प्रमुख मागण्यांपैकी गॅझेटियरसंबंधीच्या तीन मागण्या तातडीने लागू करण्याचा निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे हैदराबाद आणि सातारा गॅझेटियरची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

प्राणाची आहुती

तसेच आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील. आंदोलनात प्राणाची आहुती दिलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना एक आठवड्यात मदत दिली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

सरकारचे आभार

या निर्णयानंतर जरांगे यांनी सरकारचे आभार मानले. मात्र त्यांनी अभ्यासकांना इशारा देत सांगितले की, यावेळी चूक झाल्यास जबाबदार धरले जाईल.

सातारा गॅझेटियर

बैठकीदरम्यान शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा गॅझेटियर लागू करण्याची जबाबदारी स्वतः घेतली.

घेतलेले निर्णय

चर्चेनंतर जरांगे यांनी सरकारने घेतलेले निर्णय योग्य आहेत का याची पडताळणी करण्यासाठी अभ्यासकांकडे पाठवले जाणार असल्याचे सांगितले. 

यशस्वी शेवट

योग्य ठरल्यास त्वरित शासन निर्णय काढला जाईल. या घडामोडींमुळे मराठा आरक्षण आंदोलनाला दिलासा मिळाला असून, जरांगे पाटलांच्या उपोषणाचा यशस्वी शेवट झाला आहे.

Next : मराठ्यांची बाजू कोर्टात मांडणारे दिग्गज वकील सतीश मानेशिंदे कोण? 

येथे क्लिक करा