Aslam Shanedivan
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने विविध मागण्यांसह शेवटच्या वेतनाच्या 50% पेन्शन मिळाली अशी मागणी केली होती.
या मागणीसाठी गेल्या महिन्यात संप पुकारला होता. जो चार दिवस चालला.Sarkarnama
त्यावेळी राज्य सरकारने सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतनाच्या अंमलबजावणीचे आश्वासन दिले होते.
आता हे अश्वासन सरकारने पाळले असून सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतनाच्या अंमलबजावणीची अधिसूचना काढण्यात आली. याचा जीआर देखील काढण्यात आला आहे.
या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा मिळण्यास मदत होणार आहे.
या निर्णयामुळे आता शेवटच्या वेतनाच्या 50% पेन्शन मिळणार आहे. तसेच आता सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) लागू होणार आहे.
या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन प्रक्रियेत अधिक स्पष्टता आणि सुसूत्रता येणार आहे.
पेन्शन प्रक्रिया सोपी आणि स्पष्ट होणार असून कर्मचाऱ्यांचा पैसा सुरक्षित राहणार आहे. तर निवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल